मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भारतातला सर्वात मोठा आलू पराठा, 3 किलोचा पराठा खाल्ल्यास मिळतील 11 हजार रुपये

भारतातला सर्वात मोठा आलू पराठा, 3 किलोचा पराठा खाल्ल्यास मिळतील 11 हजार रुपये

Viral Food Challenge: आता फरीदाबादमधील एका पराठे विक्रेत्याची जोरदार चर्चा आहे.

Viral Food Challenge: आता फरीदाबादमधील एका पराठे विक्रेत्याची जोरदार चर्चा आहे.

Viral Food Challenge: आता फरीदाबादमधील एका पराठे विक्रेत्याची जोरदार चर्चा आहे.

  • Published by:  Pooja Vichare

फरिदाबाद, 18 नोव्हेंबर: सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे फूड चॅलेंज व्हायरल (Viral Food Challenge) होत आहेत. यामध्ये लोकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी बक्षीस दिलं जातंय. याशिवाय अनेक फूड ब्लॉगर्स (Food Bloggers) अनोख्या रेसिपीही (Unique Recipes) लोकांसोबत शेअर करतात. अनलॉक झाल्यापासून असे व्हिडिओचा पूर सोशल मीडियावर पाहायला मिळतो. या व्हिडीओचा फायदा असा होतो की, रस्त्यावरील लहान विक्रेतेही प्रसिद्ध होतात. आता फरिदाबादमधील एका पराठे विक्रेत्याची जोरदार चर्चा आहे.

दी चौपाल नावाच्या या फूड वेंडरनं दावा केला आहे की, त्याच्याकडे भारतातील सर्वात मोठा आलू पराठा (India’s Biggest Aloo Paratha) बनवला जातो. या पराठ्याचे वजन तीन किलोपर्यंत आहे. यामध्ये एक ते दीड किलो बटाट्याचा मसाला स्टफ केला जातो. तसेच हा पराठा दीड किलो मैद्यापासून तयार केला जातो. हा पराठा एका मोठ्या लाटणीनं पसरवला जातो. यानंतर तो अलगट तव्यावर ठेवला जातो. तो परतण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते.

india biggest paratha

पराठा अमूल बटरनं शिजवला जातो. एकदा पराठा चांगला शिजला की, लोणी, लोणचे आणि सलाडबरोबर सर्व्ह केला जातो. हा मोठा पराठा खाण्यासाठी दी चौपाल यांनी 11 हजारांचे बक्षीस ठेवलं आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने हा पराठा 20 मिनिटांत पूर्ण खाऊन दाखवला तर तो 11 हजार रुपयांचं बक्षीस मिळवू शकतो. हा मोठा एक पराठा खाल्ल्यानंतर तुम्हाला 11 हजारांचे बक्षीस मिळेल.

जर आपण फूड ब्लॉगर्सबद्दल बोललो तर आजकाल सोशल मीडियावर असे व्हिडिओ खूप पसंत केले जात आहेत. लोक हे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहतात. त्यांना लाखो व्ह्यूज मिळतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला खाऊन-पिऊन पैसे कमवायचे असतील तर हा एक पराठा खाण्याचे आव्हान तुम्ही पेलू शकता.

First published:

Tags: Social media viral