ढाका: वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर हिंसाचार; पोलिसांच्या कारवाईत 4 जणांचा मृत्यू, 50 जखमी

ढाका: वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर हिंसाचार; पोलिसांच्या कारवाईत 4 जणांचा मृत्यू, 50 जखमी

भोला जिल्ह्यात तणावाचं वातावरण, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची अधिक कुमक तैनात.

  • Share this:

ढाका, 21 ऑक्टोबर: फेसबुक पोस्टमुळे हिंसाचार झाल्याचा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. तरुणाने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे मोठी हिंसा झाली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. दरम्यान पोलिसांच्या कारवाईमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. बांग्लादेशच्या ढाका इथे हा प्रकार घडला. भोला जिल्ह्यात एका पोस्टमुळे तुफान हिंसा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मिळालेल्या अहवालानुसार एका तरुणाने निंदनीय आणि वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली होती. त्याच्याविरोधात 116 किलोमीटर लांब असलेल्या दक्षिण-पश्चिम भोला जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या पोस्टमुळे जमावामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी आंदोलन केलं. वेगवेगळे बॅनर आणि घोषणाबाजी देत जनसमुदाय मोठ्या प्रमाणात रस्तावर उतरला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी काही ठिकाणी हवेत गोळीबारही केला आहे. यामध्ये जमावाने केलेल्या प्रतिहल्ल्यात काही पोलीस जखमी झाली आहेत. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी आहेत. जखमींमध्ये काही जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकने वारंवार आवाहन करुनही असे प्रकार घडत असल्यामुळे फेसबुककडूनही पोस्ट फिलटरबाबत कठोर पावलं उचलली जाणार आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 10:38 AM IST

ताज्या बातम्या