मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुण्यातील हिंजवडी IT कंपन्यांकडून आदेशाचे उल्लंघन, वर्क फ्रॉम होम असतानाही कर्मचारी ऑफिसात

पुण्यातील हिंजवडी IT कंपन्यांकडून आदेशाचे उल्लंघन, वर्क फ्रॉम होम असतानाही कर्मचारी ऑफिसात

राज्य सरकारने सर्व खासगी कंपन्यांना 100 टक्के वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत

राज्य सरकारने सर्व खासगी कंपन्यांना 100 टक्के वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत

राज्य सरकारने सर्व खासगी कंपन्यांना 100 टक्के वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 19 मार्च : संपूर्ण जगभरात कोरोनाचा (Cororanavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व खासगी कंपन्यांना 100 टक्के वर्क फ्राॅम होमचे (work from Home) आदेश दिले आहेत. मात्र असे असतानाही पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjewadi) येथील आयटी (IT) कंपन्यांकडून या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने खासगी कंपन्यांना 100 टक्के वर्क फ्राॅम होमचे आदेश दिल्यानंतरही येथे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना दिसून आले. हिंजवडी या भागात अनेक खासगी कंपन्या आहेत. काल सरकारडून 100 टक्के वर्क फ्रॉम होमचे आदेश दिल्यानंतरही येथे अनेक कर्मचारी आढळून आले. टीव्ही9 या वाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

संबंधित - पुणे विमानतळावरील प्रवाशांचं क्वारंटाइन बंधनकारक, PMPML सेवाही हळूहळू करणार बंद

यासंदर्भात माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी एचआर व कंपनीच्या प्रमुखांशी बोलून कर्मचाऱ्यांना घरी काम करण्यास सांगावे असं आवाहन केलं. यावेळी हिंजवडी पोलिसांनी सांगितले की, ऐरवी या भागात विविध कंपनीचे तब्बल 25000 कर्मचारी असतात. मात्र आज ही संख्या 1400 पर्यंत आली आहे. असे असले तरी सर्वांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा का दिली जात नाही हा प्रश्न आहे.

संबंधित - भारताचा कोरोनाशी लढा, मोदी सरकारनं केले 6 मोठे बदल

पुणे, कल्याण, डोंबवली दुकानं बंद

पुढचा निर्णय येईपर्यंत पुण्यासह कल्याण, डोंबवली परिसरातली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं वगळता अन्य दुकानांसाठी हा निर्णय आहे.

दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. 166 रुग्णांना लागण झाली आहे. त्यातले सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे राज्यात याअगोदरच लाॅकडाउन परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून भाषण करणार आहे. यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Hinjewadi, Work from home