....आणि तावडेंनी २० मिनिटं पाहिली राज ठाकरेंची वाट

....आणि  तावडेंनी २० मिनिटं पाहिली राज ठाकरेंची वाट

विनोद तावडे आणि राज ठाकरेंनी एकमेकांची विचापूस केली. त्यानंतर विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा अभिवादन करण्यासाठी गेले

  • Share this:

01 मे:  एरव्ही हमरीतुमरीवर येणारे ,एकामेकावर टीका करणारे  राजकीय नेते एकामेकाचे चांगले मित्रही असतात. अशा राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीची महाराष्ट्राने खूप उदाहरणं पाहिली आहेत. आज असंच एक आश्चर्याचा धक्का देणारी घटना विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत घडली आहे.

आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही अभिवादन केलं. त्यानंतरही कोणाची तरी वाट बघत १५ ते २० मिनिटं थांबले. काही वेळानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गाडीतून उतरले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. विनोद तावडे आणि राज ठाकरेंनी एकमेकांची विचापूस केली. त्यानंतर विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा अभिवादन करण्यासाठी गेले. त्यानंतर एकत्रच बाहेर आले. एरवी एकमेकांवर टिका करणारे हे दोन नेते हातात हात घालून फिरताना पाहून सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला.

यातून फक्त  वैयक्तिक मैत्री खुलते की राजकीय मैत्रीही परत खुलेल  हे पाहणं  महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: May 1, 2018, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading