मोफत शिक्षणावर विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य, विद्यार्थ्यांनी पोस्टरवर मारल्या चपला

मोफत शिक्षणावर विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य, विद्यार्थ्यांनी पोस्टरवर मारल्या चपला

'आर्थिकदृष्ट्या तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा' असं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

  • Share this:

संजय शेडे, प्रतिनिधी

अमरावती, 05 जानेवारी : 'आर्थिकदृष्ट्या तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा' असं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिक्षण देणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अमरावती इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पोस्टरला काळं फासून, चपला मारल्या आणि शिक्षण मंत्री मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.

विनोद तावडे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, 'गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?' असा प्रश्न एका पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ाने विचारला असता 'शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर' असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं.

बरं इतकंच नाही, तर ज्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थाला त्यांनी रेकॉर्डींग डिलीट कर असं म्हटलं. पण त्यावर 'या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या' असे आदेशही विनोद तावडे यांनी दिले. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केले.

"आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू की विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊ" असं वादग्रस्त वक्तव्यदेखील विनोद तावडे यांनी केलं. एका शिक्षण मंत्र्यांनी अशी उत्तर द्यावी का असा सवाल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

शिक्षण मंत्र्यांनीच जर असं वक्तव्य केलं तर गरीब मुलांना उच्च शिक्षण घेता येणार का ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्टरला काळं पासलं आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

First published: January 5, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading