कनिष्ठ महाविद्यालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करणार - तावडे

कनिष्ठ महाविद्यालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करणार - तावडे

खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमँट्रीक हजेरी बंधनकारक करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

  • Share this:

21 डिसेंबर, नागपूर : खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमँट्रीक हजेरी बंधनकारक करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. खाजगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली.

खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी विचारला होता, या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही तावडे यांनी विधानसभेत हीच घोषणा केली होती. पण त्यावर पुढे काही कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे तावडे एकप्रकारे गेल्यावर्षीचीच घोषणा आज नव्याने केली असल्याचं बोललं जातंय.

अनेक विद्यार्थी कॉलेजला अॅडमिशन घेतात, मात्र हजेरी लावत नाहीत. ते खासगी क्लास लावून परीक्षा देतात. अनेकवेळा कॉलेज आणि क्लासचं साटंलोटं असतं. क्लासमुळे विद्यार्थ्यांची कॉलेजला गैरहजेरी असते. ही गैरहजेरी टाळणं तसंच खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी, सातत्याने होत होती. त्याबाबत आता सरकारने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 06:10 PM IST

ताज्या बातम्या