मेटेंची पंकजा मुंडेंविरोधात भूमिका, आता भाजप कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे यांनी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 09:06 PM IST

मेटेंची पंकजा मुंडेंविरोधात भूमिका, आता भाजप कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 11 एप्रिल : भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे यांनी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली,पराभूत झाल्यावर भाजपाने विधान परिषदेची आमदारकी दिली. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केलं तेच आमदार विनायक मेटे जर भाजप विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे विनायक मेटेंची पक्षाच्या कोटय़ातील आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केली आहे.

सतत मेटे हे पक्ष विरोधी भूमिका घेतात. गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी दिली. त्यांच्याविरोधात पत्रक काढणारे मेटे आज पंकजा यांना विरोध करणार असतील तर आम्ही भाजपा प्रदेश अध्यक्ष यांना भेटून लेखी तक्रार देणार असंही पोकळे यांनी सांगितलं.

2014च्या निवडणुकीत माझ्या पराभवासाठी पंकजा मुंडेंनी विरोधात काम केलं. तसंच वारंवार पक्षश्रेष्ठीनी सांगून पंकजा मुंडे ऐकत नाहीत म्हणून विनायक मेटेंनी आज थेट राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली. शेतकरी पुत्राला मदत करा, असं आवाहनच त्यांनी केलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे या शिवसंग्रामच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दुष्काळ, चारा छावण्या मंजुरी, दुष्काळी उपाय योजनाची कामं, यामध्ये टाळाटाळ करून टोकाला जावून विरोध करत आहेत. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात असेन पण बीडमध्ये नाही, अशी जाहीर भूमिका आमदार मेटेंनी यापूर्वी जाहीर केली होती. आज मेंटेनी उघड उघड पंकजा मुंडेंच्या नेतृत्त्वाविरोधात भूमिका जाहीर केली आहे. बीड शहरातील आशीर्वाद लॉनमध्ये आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंची डोकेदुखी आणखी वाढली आहे. मात्र, मेटे यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे मतदानाचा किती फटका बसेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close