किंगफिशर व्हिलाला नवा मालक, सचिन जोशीनं 73 कोटींना घेतला विकत

किंगफिशर व्हिलाला नवा मालक, सचिन जोशीनं 73 कोटींना घेतला विकत

अभिनेता आणि निर्माता सचिन जोशीनं मल्ल्याचा हा गोव्यातला बंगला 73 कोटींना विकत घेतलाय.

  • Share this:

08 एप्रिल : अखेर उद्योगपती विजय मल्ल्याच्या गोव्यातल्या अलिशान किंगफिशर व्हिलाला नवा खरेदीदार सापडलाय. अभिनेता आणि निर्माता सचिन जोशीनं मल्ल्याचा हा गोव्यातला बंगला 73 कोटींना विकत घेतलाय.

कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्यानं देशातून पळ काढल्यानंतर त्याच्या गोव्यातल्या ह्या बंगल्याला दोन बोली लावली गेली, पण दोन्ही वेळेस तो विकला गेला नाही. कारण बंगल्याची एसबीआयनं लावलेली 83 कोटी रूपयांची मोठी रक्कम. शेवटी अभिनेता सचिन जोशीनं हा बंगला 73 कोटींना विकत घेतलाय.

कसा आहे किंगफिशर व्हिला ?

गोव्यातल्या पॉश भागात 3 एकरवर कांदोलिममध्ये पसरलाय किंगफिशर व्हिला

किंगफिशर व्हिलामध्ये सध्या 20 पेक्षा जास्त महागड्या कार्स, मल्ल्याची फेरारीही

गाड्यांची स्वतंत्र विक्री, घर मात्र अभिनेता सचिन जोशीनं विकत घेतलं

किंगफिशर व्हिलामध्ये स्विमिंग पूल, डान्स फ्लोअर ज्याचा हेलिपॅडसाठीही वापर

किंगफिशर व्हिलामध्ये 3 बेडरूम्स आणि प्रशस्त असा हॉल, सगळीकडं दिसणारी श्रीमंती

First published: April 8, 2017, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading