कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक व सुटका

भारतीय बँकाँना करोडो रुपयांना चुना लावून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक केली होती. पण स्थानिक कोर्टाने मल्ल्याला काही तासातच जामीन मंजूर केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2017 05:55 PM IST

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक व सुटका

लंडन, 3 ऑक्टोबर : भारतीय बँकाँना करोडो रुपयांना चुना लावून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आलीय. दूरदर्शनने मल्ल्याच्या लंडनमधील अटकेचं वृत्तं दिलंय. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ही करण्यात आल्याची माहिती ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्यूशन सर्व्हिसने दिली. भारतातील तपास यंत्रणा अंमलबजावणी संचलनालय अर्थात 'ईडी' अर्जानंतर लंडन पोलिसांनी ही कारवाई केलीय. दरम्यान, मल्ल्याला तिथल्या कोर्टाने काही तासातच जामीन मंजूर केलाय.

विजय मल्ल्याला यापूर्वीही लंडन पोलिसांनी अटक केली होती. पण त्याचा लगेचच काही तासातच जामिनावर सुटका झालीय आणि आताही नेमकं तेच झालंय. त्यामुळे मल्ल्याला पडकून भारतात आणण्याचं ईडीचे प्रयत्न पुन्हा अपुरे पडलेत, असंच म्हणावं लागेल

विजय मल्ल्याने किंगफिशर कंपनीसाठी एसबीआयसह प्रमुख भारतीय बँकांकडून कोट्यावधीचं कर्ज घेतलं होतं. पण कोट्यावधींचं कर्ज न फेडताच मल्ला परदेशी पळून गेलाय. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची थकबाकी येणं अपेक्षित आहे. तर आयडीबीआय बँकेचं कर्ज वसूल करण्यासाठी ईडीने मल्ल्याची भारतातील 1411 कोटींची संपत्ती याआधीच जप्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...