मुंबई,ता.24 जुलै : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात परत येवून खटल्याला सामोरे जायचं अशी माहिती ईडी च्या सूत्रांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच ईडी ने विजय मल्ल्याला फरार घोषी करून त्याच्या संपत्तीवर टांच आणण्याची तयारी सुरू केली होती. मल्ल्या सध्या लंडनमध्ये असून तिथल्या कोर्टानही त्याच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले होते. मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी सरकारनं प्रत्यार्पणाची कारवाईही सुरू केली आहे. कुठल्याच न्यायालयाकडून दिलासा मिळत नसल्याने मल्ल्याभोवतीचा फास आवळला जात आहे. भारतात आणि ब्रिटनमधल्या संपत्तीवर जप्ती आल्याने त्याच्या मुसक्या आवळल्या जात असून त्याचे मिळकतीचे मार्गही बंद होत आहेत. त्यामुळे त्याने चौकशी यंत्रणांशी सहकार्य करण्याचा विचार केलेला असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतातल्या विविध बँकांचे 10 कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवून मल्ल्या ब्रिटनमध्ये पळून गेला होता. तिथंही त्याची संपत्ती असल्याने तो अलिशान जिवन जगत असल्याची माहिती पुढे आली होती. त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं हा विषय लावून धरला होता. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यामध्येही त्यांनी हा विषय ब्रिटन सरकारकडे लावून धरल्याने प्रक्रियेला वेगही आला आहे.
मल्ल्याच्या भारतातल्या अनेक मालमत्ता या आधीच जप्त करण्यात आल्या असून सर्व बँक खाती सील करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार बंद झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने ट्विट करून सरकारला लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं होतं. त्यात अत्यंत निलाजरेपणाने त्याने मी निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. बँका आणि सरकारने मझी पोस्टर बॉय अशी प्रतिमा केली असा आरोपही त्यांने केला होता.
हेही वाचा...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा