• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • गणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराने निधन

गणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराने निधन

ख्यातनाम गणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय... मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. त्यांनी दादरमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:
मुंबई, 26 जुलै : ख्यातनाम गणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय... मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. त्यांनी दादरमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. खातू यांनी साकारलेल्या गणेशमूर्ती फक्त महाराष्ट्रात नाहीतर जगभरातही प्रसिद्ध आहेत. खातू यांचा मुंबईत परेल वर्कशॉपजवळ गणेश मूर्तींचा कारखाना असून आगामी गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात होतं. चंदनवाडी, खेतवाडी, तुलसीवाडी, चिराबाझार, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, वसईचा महाराजा यासारख्या गणेशमूर्ती खातू तयार करायचे. गेल्या 40 वर्षांत त्यांनी 250 पेक्षा जास्त 25 फुटांहून जास्त उंचीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील भाविकांकडे त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते. वडील रामकृष्ण खातू यांच्याकडून विजय खातूंनी गणेशमूर्ती साकारण्याचा वसा घेतला. पर्यावरण विषयक जागृतीमुळे खातू यांनी लालबाग-परळमधील कारखान्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूच्या मातींची निवड केली.
First published: