काँग्रेसची विधानसभेसाठी मोठी घोषणा, अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना दिली मुदत

काँग्रेसची विधानसभेसाठी मोठी घोषणा, अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना दिली मुदत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 22 जून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचं काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्षांमध्ये महत्त्वाच्या बैठकी घेण्याचं सत्र सध्या सुरू आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत.

याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत. अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या या घोषणेनंतर आता विधानसभेसाठी कोण अर्ज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपने पुढचं टार्गेट विधानसभा निवडणुकांचं ठेवलं आहे. त्यासाठी पक्षात जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांकडून बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधार भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणुकीचा अजेंडा आणि विरोधकांना शह देण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.

हेही वाचा : विधासभेआधीच काँग्रेसला धक्का, 'हा' मंत्री'पुत्र' हाती घेणार शिवसेनेचा झेंडा

दरम्यान, शिवसेनेनंही विधानसभा निवडणुकीसाठी  तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीतही त्याचदृष्टीने अजेंडा ठरवला गेला का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे.

VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading