विधान परिषदेची कोंडी फुटली, सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार मागे

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर विधानपरिषदेची कोंडी फुटलीय. सत्ताधाऱ्यांनी कामकाजावरचा बहिष्कार अखेर मागे घेतलाय. सभागृहाचं कामकाज नियमानं चालवण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2017 01:58 PM IST

विधान परिषदेची कोंडी फुटली, सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार मागे

मुंबई, 3 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर विधानपरिषदेची कोंडी फुटलीय. सत्ताधाऱ्यांनी कामकाजावरचा बहिष्कार अखेर मागे घेतलाय. सभागृहाचं कामकाज नियमानं चालवण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालं. सभापतींच्या दालनात ही बैठक झाली. तिथेही सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये बरीच वादावादी झाली. अखेर मुख्यमंत्री आणि सभापती यांनी सामंजस्याची भूमिका घेत हा वाद मिटवला.

या बैठकीत सभापतींनी कामकाजाबाबत आचारसंहिता मांडण्याचंही मान्य करण्यात आलं. दरम्यान, सरकारने मोपलवारांना पदावरून हटवलं असलं तरी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अजूनही आक्रमक आहेत. त्यामुळे प्रकाश मेहतांबाबत मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...