अशी अद्दल घडलीच नसेल! तोंडात रॉकेल घेऊन करत होता आगीचे खेळ आणि...

अशी अद्दल घडलीच नसेल! तोंडात रॉकेल घेऊन करत होता आगीचे खेळ आणि...

आगीसोबत पंगा घेणं चांगलच महागात पडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी: अनेक स्टंटचे व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करणं ही सध्या फॅशन झाली आहे. अनेकदा हे स्टंट जीवावरही बेतू शकतात याची कल्पना असूनही ते केले जातात. सोशल मीडियावर असाच एक स्टंटबाजाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वृद्ध व्यक्तीनं आपल्या जीवची पर्वा न करता थेट आगीसोबत पंगा घेतला आणि मग दंगा केला. अनेकदा हा स्टंट आपल्या जीवावर बेतू शकतो हे माहीत असूनही बिनधास्तपणे करणाऱ्या या वृद्धाला स्टंट करणं यावेळी चांगलचं महागात पडलं आहे. आगीसोबत खेळल्यानं काय होतं? याचं प्रत्यक्ष उदाहरण हा व्हिडिओ देत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती काडेपटीतून काडी काढून ती पेटवतो आणि फुंकर मारून ती आग मोठी करतो. त्याच्या स्टंटचं आजूबाजूच्या तरुणांना नवल वाटतं. तो पुन्हा एकदा हा स्टंट करायला जातो आणि पुढे तो स्टंटजीवावर बेततो.

या स्टंटमध्ये आपण पाहू शकता की वृद्ध व्यक्तीच्या दाढीलाच आग लागते आणि तो भाजतो. वेळीच सावरून तो आपल्या दाढीला लागलेली आग विझवतो. मात्र या दुर्घटनेट सुदैवानं त्याचा जीव वाचला आहे. या वृद्धाचा व्हिडिओ Memekesto 2.0 या फेसबुक पेजवर 23 जानेवारीला अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 71 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 20 लोकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाही मात्र अशा पद्धतीचे स्टंट जीवावर बेतू शकतात हे माहीत असूनही विषाची परीक्षा घेण्यासारखं आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

हेही वाचा-सच्चा भक्त! श्वानाने परफेक्ट सुरात गायले तुक्याचे अभंग VIDEO VIRAL

हेही वाचा-VIDEO : 300 रुपयांसाठी आलेला भाजपचा समर्थक काय म्हणतोय पाहा...

First published: February 4, 2020, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading