'भारतात बॉम्बस्फोट कराल तर मिळतील हवे तेवढे पैसे',पाकिस्तानमधला व्हिडिओ व्हायरल

भारत आणि पाकिस्तानमधल्या शत्रुत्वाचे तुम्ही हजारो व्हिडिओ पाहिले असतील. पाकिस्तानला दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा देश म्हटलं जातं. याचाच पुरावा देणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 06:37 PM IST

'भारतात बॉम्बस्फोट कराल तर मिळतील हवे तेवढे पैसे',पाकिस्तानमधला व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तानमधल्या शत्रुत्वाचे तुम्ही हजारो व्हिडिओ पाहिले असतील. पाकिस्तानला दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा देश म्हटलं जातं. याचाच पुरावा देणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये शूट करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या हातात रुपयांनी भरलेली सूटकेस घेऊन लोकांना विचारतो, भारत हा आमचा शत्रू देश आहे. तुम्ही तिथे बॉम्बस्फोट घडवाल का? या बदल्यात पाहिजे तेवढे पैसे घेऊ शकता.

ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात की शत्रूच्या देशात बॉम्बस्फोट घडवायचा आहे आणि त्यासाठी जाण्यायेण्याचा खर्च केला जाईल.

पैशाचं आमिष दाखवूनही पाकिस्तानमधल्या नागरिकांनी यावर नकार दिला.खरंतर गुप्त पद्धतीने शूट केल्यामुळे कुणालाही हा व्हिडिओ शूट होताना कळलं नाही. एक जण पैसे देऊ पाहणाऱ्या एकाला लाथा मारू लागला.त्यांनी या गोष्टीला प्रतिकारही केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये जेवढा तणाव आहे त्या स्थितीत हा व्हिडिओ पाहून दिलासा मिळेल. पाकिस्तानमध्ये लोकांना दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त केलं जात असलं तरी लोक मात्र अशा कारवायांना थारा देत नाहीत.

Loading...

=============================================================================================

VIDEO : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार? शरद पवारांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...