VIDEO : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे धबधब्यात पडले,पण...

हिमायत नगर तालुक्यातील हा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 10:48 PM IST

VIDEO : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे धबधब्यात पडले,पण...

नांदेड, 27 जून : सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवक धबधब्यात पडले पण पोहता येत असल्याने दोघेही बचावले. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात ही घटना घडली.

पहिल्याच पावसाने सहस्त्रकुंड धबधब्याला पाणी आले. हिमायत नगर तालुक्यातील हा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. पण सेल्फी घेण्याच्या मोहात अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घातलं आहेत. बुधवारी देखील सेल्फी काढताना तोल जाऊन दोन युवक धबधब्यात पडले. पोहता येत असल्याने दोघेही सुखरूप बाहेर आले. सुदैवाने धबधब्याच्या पाण्याची धार मोठी नव्हती अन्यथा दोघेही पाण्यासोबत वाहून गेले असते.

कठड्याबाहेर उभं राहून सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू !

हे दोन्ही तरुण मुदखेड तालुक्यातील मुगट येथील रहिवाशी आहेत. आपल्या अन्य मित्रासोबत हे दोघे पण सहस्त्रकुंड धबधब्यावर आले होते. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने पर्यटक धोकादायक जागांवर जाऊन सेल्फी काढत आहेत. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी अश्या घटना घडत आहेत.

अकोल्याच्या एका पोलिसासह पाच पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुडून मृत्यू

Loading...

VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...