फरीदाबाद, 15 ऑक्टोबर : फरीदाबादमधील (Faridabad News) जवाहर कॉलनीमधून जाणाऱ्या एका महिलेला फोनवर बोलत जाणं महागात पडलं आहे. ही महिला मोबाइल फोनवरुन बोलत (Talking on Mobile while walking) रस्त्यावरून चालत होती. दरम्यान रस्त्यातील खुल्या मॅनहोलकडे तिचं लक्ष गेलं नाही. आणि ती आपल्या मुलासह खाली पडली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला फोनवरुन बोलत असताना जात आहे. मोबाइलवर बोलत असताना तिचं लक्ष खुल्या गटारीकडे गेलं नाही आणि ती थेट बाळासह त्यात पडली.
त्याच वेळी आजूबाजूच्या लोकांनी महिलेला मॅनहोलमध्ये पडताना पाहिलं आणि ते तिच्या मदतीसाठी धावत आले. बाळाला बाहेर काढण्यासाठी एक तरूण आत उतरला. (VIDEO Talking on mobile while walking on the road is expensive The horrible state of the baby with the woman)
हे ही वाचा-मंदिरात चक्क देवीच्या मूर्तीसमोर चोरी; टोळीने सर्वांसमोर साधला डाव, पाहा VIDEO
आणि बऱ्याच प्रयत्नांनतर महिला आणि तिच्या मुलाला बाहेर काढण्यात आलं. सीव्हरेज लाइनच्या वर ठेवलं जाणारं झाकण अनेक दिवसांपूर्वी तुटलं होतं. यापासून बचाव करण्यासाठी एक स्टँडदेखील ठेवण्यात आलं होतं.
पालिकेला याबाबत अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र ते याच्या दुरुस्तीसाठी आले नाहीत. परिणामी एक महिला आणि मुलासह आत पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि पालिकेवर जोरदार टीका केली जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.