• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • VIDEO : कोल्हापूरची अजब कहाणी; गावात शून्य मतदान, उमेदवारानेही केलं नाही VOTE

VIDEO : कोल्हापूरची अजब कहाणी; गावात शून्य मतदान, उमेदवारानेही केलं नाही VOTE

ऐरवी मतदानाच्या दिवशी गावात गोंधळ असतो. गावकरी रांग लावून मतदान देण्यासाठी उभे असतात. मात्र आज या गावातील चित्रं वेगळंच होतं.

  • Share this:
कोल्हापूर, 15 जानेवारी : सध्या राज्यात सुरू असलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीदरम्यान एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. येथे एका गावात एकाही नागरिकाने मतदान केलं नाही. ही बातमी ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ऐरवी मतदानाच्या दिवशी गावात गोंधळ असतो. गावकरी रांग लावून मतदान देण्यासाठी उभे असतात. मात्र यंदाच्या वर्षी असं काहीही या गावात पाहायला मिळालं नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेरीडमध्ये आश्चर्यकारक निवडणूक झाल्याचे समोर आले आहे. येथील एका वॉर्डात 2 उमेदवार रिंगणात उभे होते. या दोन उमेदवारांपैकी एकालाही मतं मिळाली नाहीत. इतकच नाही तर उमेदवाराने स्वत:लाही मतदान केलं नाही. हे ही वाचा-बुलेटला 'बॅलेट'ने उत्तर, 10 किमी पायपीट करून केले मतदान! गेल्या 65 वर्षांपासून येथे बिनविरोध निवडणूक होत होती. तर यंदा एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. पण दोन्ही उमेद्वारांसह कुणीच मतदान केलं नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पेरीड या गावात 65 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. त्यामुळे काल रात्री गावात एक मिटिंग झाली अशी माहिती समोर आली आहे. त्या मिटिंगनुसार आज मतदारांसह जे दोन उमेदवार रिंगणात होते त्या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे एका जागेवरची निवडणूक अजूनही अधांतरीच आहे. इतर वॉर्डात बिनविरोध निवडणूक झाली असली तरी या वॉर्डातील निवडणूक आता पुन्हा बिनविरोध होणार की मतदान होणार याबाबत कोल्हापूर जिल्ह्यात आता उत्सुकता वाढली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: