08 जानेवारी : तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अॅपचं वापर करा. कारण IRCTC च्या अॅपवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. आता एका युजरला 12 तिकीटं बुक करता येणार आहेत.एका महिन्यात 12 तिकीटं बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC अकाऊंटला आधारसोबत लिंक करावं लागेल. सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर माय प्रोफाइलमध्ये जाऊन KYC या पर्यायावर क्लिक करावं लागेल. आधार कार्ड क्रमांक नमुद केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आधारसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. तो क्रमांक तिथे टाकावा.