VIDEO : धमक्या देणाऱ्या गुंडाची नागरिकांनी केली धुलाई,काढली नग्न धिंड

VIDEO : धमक्या देणाऱ्या गुंडाची नागरिकांनी केली धुलाई,काढली नग्न धिंड

दीड महिन्यापूर्वी त्याचा भाऊ रवी डोंगरे आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणाचा खून केला होता. त्या सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली.

  • Share this:

मुजीब शेख, नांदेड, 28 जुलै :  धमक्या देणाऱ्या गुंडाची नग्न धिंड काढून नागरिकांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. नांदेड शहारातील महेबुबनगरमधील नागरिकांनी या गुंडाला चोप देऊन त्याला नग्न करून धिंड काढली. अनिल डोंगरे असं या गुंडाचं नाव आहे.

दीड महिन्यापूर्वी त्याचा भाऊ रवी डोंगरे आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणाचा खून केला होता. त्या सर्व  आरोपीना पोलिसांनी अटक केली. त्या घटनेतील मयताचे नातेवाईक आणि साक्षीदार असलेल्या नागरिकांना हा अनिल डोंगरे धमकावत होता. तुमच्यामुळे माझा भाऊ जेलमध्ये असल्याचे सांगून तो वांरवार गल्लीतल्या नागरिकांना धमक्या देत होता.

कंटाळलेल्या लोकांनी गुंड अनिल डोंगरे याला धरुन त्याची चांगलीच धुलाई केली. नंतर त्याला नग्न करून त्याची धिंड काढत पोलीस ठाण्यात नागरीक पोहचले. महेबुबनगर ते विमानतळ पोलीस ठाण्यापर्यंत नागरिकांनी गुंडाची धिंड काढली. पोलिसांनी या गुंडाला ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 08:49 PM IST

ताज्या बातम्या