VIDEO : समृद्धी महामार्गाला जिजाऊंचं नाव द्या -संभाजीराजे

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं आज जिजाऊ माँ साहेबांचा ४२१ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 07:01 PM IST

VIDEO : समृद्धी महामार्गाला जिजाऊंचं नाव द्या -संभाजीराजे

अमोल गावंडे,प्रतिनिधीबुलडाणा, 12 जानेवारी : 'मुंबई ते नागपूर हा 800 किमीचा समृद्धी महामार्ग जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे', अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

सिंदखेडराजामधील कार्यक्रमात ते बोलत होते.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं आज जिजाऊ माँ साहेबांचा ४२१ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. आज सूर्योदयाच्यावेळी विविध मान्यवरांनी जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात जाऊन अभिवादन केलं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, जिजाऊ वंशज लखोजी राजे जिजाऊ चरणी नतमस्तक झाले होते.

दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळाही रंगला. या कार्यक्रमात छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले हेही उपस्थित होते. तसंच छोट्या पडद्यावर संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी इथं आपले विचार मांडले होते.

============================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...