अद्वैत मेहता, पुणे, 14 मार्च : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सोशल मीडियावर शिव्या घालणाऱ्या घरात घुसून ट्रोलर्सना ठोकून काढा, असा आदेश दिला होता. राज ठाकरेंच्या या आदेशानंतर पुण्यातील हडपसर भागातील एका तरुणाच्या घरात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आपल्या समर्थकांसह पोहोचले. परंतु, हा तरुण घरी नव्हता. या तरुणाने सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या विरोधात अर्वाच्च भाषेत पोस्ट टाकली होती. मनसैनिकांनी याबद्दल नातेवाईकांना जाब विचारला असता मोठा वाद झाला. सदर तरुणाने या आधीही असे प्रकार केले होते. त्याच्या मनावर परिणाम झाला असून तो मनोविकार आहे असं सांगितल्यावर हा वाद थंडावला.