S M L

VIDEO : नोकरीवरुन काढलं म्हणून आत्महत्येसाठी टॉवरवर चढला पण...

टाॅवरवर चढल्यानंतर त्यानेच पोलीस कंट्रोलरुमला फोन करून आपण टाॅवरवर चढलो असून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं.

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2018 08:47 PM IST

VIDEO : नोकरीवरुन काढलं म्हणून आत्महत्येसाठी टॉवरवर चढला पण...

मुंबई, 06 जुलै : वरळी परिसरात एक तरुण दुरदर्शनच्या टाॅवरवर चढून शोले स्टाईल राडा घातला. लोकांनी या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला पण तो काही खाली आला नाही. अखेर अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवले.

अजय पासवान असं या तरुणाचं नाव आहे. अजयने टाॅवरवर चढून आत्महत्याचा इरादा केला होता. अजय हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. पण अचानक नोकरी गेल्यामुळे त्याने टाॅवरवरुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि टाॅवरवर चढला. टाॅवरवर चढल्यानंतर त्यानेच पोलीस कंट्रोलरुमला फोन करून आपण टाॅवरवर चढलो असून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी टाॅवरवर चढून अजयची मनधरणी केली आणि चार तासानंतर त्याला सुखरूप खाली उतरवलं. सध्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 08:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close