Home /News /news /

डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये मजेत अंघोळ करताना केला VIDEO; नंतर झालं असं..

डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये मजेत अंघोळ करताना केला VIDEO; नंतर झालं असं..

कर्मचाऱ्याच्या अंघोळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे

    सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. रिपोर्टनुसार तुर्कीतील एका डेअरी प्लांटमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक कर्मचारी दुधाने भरलेल्या टबमध्ये आंघोळ करीत आहे. ही 11 सेकंदाची क्लिप टिकटॉकवर शेअर करण्यात आली होती. ज्यानंतर nedenttoldu नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्लांट बंद करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर 5 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता, ज्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळत आहे. सोबतच शेकडो लोक आपल्यी प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. व्हायरल क्लिपमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये आंधोळ करीत आहे. Hurriyet Daily News च्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ कोनाच्या केंद्रीय अनातोलियन प्रांतातील एका डेअरी प्लांटचा आहे. दुधामध्ये आंघोळ करणाऱ्या व्यक्तीचे नाव Emre Sayer असे आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर Ugur Tuthut नावाच्या युजरने शेअर केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डेअरी प्लांटला बंद करण्यात आलं आहे. सोबतच त्याच्यावर दंडही लावण्यात आला आहे. Ugur Turgut याला घटनेनंतर नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. तर यावर त्याचं म्हणणं आहे की तो दुधात अंघोळ करीत नव्हता. तर ते पाणी आणि क्लिनिंग मेटेरिअलचं मिश्रण आहे. हे ही वाचा-नातवाला शिकवता शिकवता आजीचं नशीब फळफळलं; पुस्तकात मिळाला असा खजिना झाली कोट्यधीश या घटनेनंतर कोन्या एग्रीकल्चर अँण्ड फॉरेस्ट्री मॅनेजर अली एरगिनने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि फॅक्ट्रीला बंद केलं आहे. सोबतच कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Turkey

    पुढील बातम्या