S M L

VIDEO : वारकऱ्यांसाठी भाऊजी झाले ट्रॅफिक हवालदार !

Updated On: Jul 10, 2018 11:39 PM IST

VIDEO : वारकऱ्यांसाठी भाऊजी झाले ट्रॅफिक हवालदार !

पंढरपूर, 10 जुलै : भाऊजी या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर सोमवारी दिवेघाटात ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत पाहायला मिळाले. चित्रपट, टीव्ही सिरीयल, राजकारण आणि समाजकारणात आदेश बांदेकर यांचा दबदबा आहे पण काल वारकऱ्यांच्या मदतीसाठी भर पावसात धावून जाणं अनेकांना भावलं. त्याच असं झालं भाऊजी एका शो च्या शूटच्या निमित्ताने दिवे घाटात गेले होते.

दरम्यान, पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालख्या या  घाटात पोहचल्या, संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी जाम झाला. घाटात अडकलेल्या वारकरी भाविकांना पुढेही जाता येईना आणि मागेही...वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयन्त तोडले पडू लागले.

VIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली


पावसाची रिपरिप आणि खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आबालवृद्ध बेहाल झाले. वारकऱ्यांचे हाल पाहून भाऊजी पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागले. वारकऱ्यांना हात जोडून एका बाजूने चालण्यास सांगून मोठ्या गाड्यांना रस्ता करून दिला.

VIDEO : अतिविषारी घोणसच्या 96 पिल्लांचा जन्मोत्सव

पावसाची तमा न बाळगता, आपण सेलिब्रेटी आहोत शिवसेनेचे नेते आहोत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आहोत हे सगळं विसरून आदेश बांदेकर यांनी ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत शिरले.

Loading...

वाहतुकीच्या सूचना देणारे पोलीस नसून आपले लाडके भाऊजी आहेत आणि ते आपल्याला विनंती करीत आहेत म्हटल्यावर वारकऱ्यांनी हसतमुखाने सूचनांचे पालन केले

पावसाची तमा न बाळगता आपण कोण आहोत हे विसरून बांदेकरांनी केलेली ट्रॅफिक हवालदाराची भूमिका अनेकांना भावली..

 

VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 11:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close