S M L

VIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कुर्ला येथील फलाट क्रमांक 1 वर गुरूवारी लोकलमधून एक महिला उतरली असता तिच्या हातातली मोबाईल हिसकावून जैनब पठाण ही अट्टल चोर पळू लागली.

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2018 09:09 PM IST

VIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

मुंबई, 30 जून : महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुर्ला रेल्वे स्थानकावर एका महिला मोबाईल चोराचा पाठलाग करून पकडलंय. ही महिला लोकलच्या महिला डब्यातील महिलांचे मोबाईल,पर्स चोरी करत असे. रेल्वे पोलिसानी तिला अटक केली असून आता तिच्याकडून इतर गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता आहे.

कुर्ला येथील फलाट क्रमांक 1 वर गुरूवारी लोकलमधून एक महिला उतरली असता तिच्या हातातली मोबाईल हिसकावून जैनब पठाण ही अट्टल चोर पळू लागली. ही घटना पाहणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी तिचा पळत पाठलाग केला. या वेळी या महिला चोराने अगदी रेल्वे रुळावर उडी घेतली, तिच्या मागे या जवानांनी देखील उडी घेत तिला रंगेहात जेरबंद केलं. जैनब ही अट्टल चोर असून तिला लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सध्या तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा

बर्थडे स्पेशल : सुप्रिया सुळे-आई ते लोकनेत्या, पहा फोटो गॅलरी

 'धूम 4'मध्येही सलमान-कतरिनाची जोडी

Loading...
Loading...

 VIDEO - 'संजू' सिनेमा आहे तरी कसा? पहा रिव्ह्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 09:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close