VIDEO- ...जेव्हा मराठमोळी आशा ताई विकी कौशलची दृष्ट काढते

रुग्णालयातून घरी गेल्याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 01:40 PM IST

VIDEO- ...जेव्हा मराठमोळी आशा ताई विकी कौशलची दृष्ट काढते

मुंबई, २१ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा अपघात झाला असून यात त्याला जबर दुखापत झाली आहे. गुजरातमध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. विकी एक अॅक्शन सीक्वेन्स शूट करत होतो तेव्हा हा अपघात झाला. सध्या त्याचे उपचार मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत.

रुग्णालयातून घरी गेल्याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो घराच्या दारात उभा राहिलेला दिसत आहे. त्याच्या घरी काम करणाऱ्या आशा ताई त्याची दृष्ट काढताना दिसत आहेत. यावेळी विकी आशा ताईशी मराठीत बोलताना दिसत आहे. या दोघांमधला हा संवाद ऐकून तुम्हालाही हसू येईल.

प्रेम, आपुलकी म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. विकीचा अपघात झाला आणि तो सुखरूप घरी परतला यामुळे आशाताई त्याची आपुलकीने दृष्ट काढताना दिसत आहेत. फार क्वचितच बॉलिवूड स्टार अशापद्धतीचे व्हिडीओ शेअर करतात. विकी मात्र याला अपवाद ठरला. त्याच्या याच वागणुकीमुळे आज तो लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला आहे.

दरम्यान, एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा पडला. ज्यामुळे चेहऱ्याचं हाड (चीकबोन) फ्रॅक्चर झालं आहे. गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं शिप ब्रेकिंग यार्ड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकीला धावत जाऊन एक दरवाजा उघडायचा होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो दरवाजा विकी कौशलवरच पडला. हा अपघात घडल्यावर त्याला लगेच जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले, ज्यानंतर त्याला विमानाने मुंबईत आणले गेले. सध्या त्याचे उपचार मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत.

ज्या सिनेमाचं चित्रीकरण करताना विकीचा अपघात झाला त्याची निर्मिती करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन करत आहे. विकीशिवाय या सिनेमात भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका आहे. भूमीचा याआधी ‘सोनचिडिया’ सिनेमा प्रदर्शित झाला तर लवकरच ती तापसी पन्नूसोबत ‘सांड की आंख’ सिनेमात दिसणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...