अखेर प्रवीण तोगडिया अहमदाबादेतच सापडले पण बेशुद्ध अवस्थेत, उपचार सुरू

अखेर प्रवीण तोगडिया अहमदाबादेतच सापडले पण बेशुद्ध अवस्थेत, उपचार सुरू

आज सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता असलेले प्रवीण तोगडिया अखेर अहमदाबादमध्येच सापडलेत. प्रवीण तोगडिया हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांना आता चंद्रमणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. राजस्थान पोलिसांनीच तोगडिया यांना गायब केल्याचा गंभीर आरोप व्हीएचपीच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

  • Share this:

15 जानेवारी, अहमदाबाद : आज सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता असलेले प्रवीण तोगडिया अखेर अहमदाबादमध्येच सापडलेत. प्रवीण तोगडिया हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांना आता चंद्रमणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. राजस्थान पोलिसांनीच तोगडिया यांना गायब केल्याचा गंभीर आरोप व्हीएचपीच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

याच मुद्यावरून व्हीएचपीने आज अहमदाबादसह इतर शहरांमध्ये पोलिसाविरोधात आक्रमक आंदोलनही केलं होतं. एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांना अटक करायला सोमवारी अहमदाबादमध्ये आले होते. मात्र, त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचे सांगितले होते. तसेच आम्ही सध्या त्यांचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी म्हटले होते.

प्रवीण तोगडिया यांच्यावर सार्वजनिक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांच्या निवासस्थानी त्यांना अटक करायला गेले होते. मात्र, आम्ही घरी गेलो तेव्हा तोगडिया तिथे नव्हतेच, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही बातमी ऐकल्यानंतर विहिंपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले, असा आरोप करत विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सोला पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता.

First published: January 15, 2018, 10:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading