Home /News /news /

महाराष्ट्रावर शोककळा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि जेल फोडो आंदोलनातील शेवटच्या शिलेदाराचं निधन

महाराष्ट्रावर शोककळा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि जेल फोडो आंदोलनातील शेवटच्या शिलेदाराचं निधन

ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी त्या काळात मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल बारा वर्षे ते भूमिगत राहिले.

सांगली, 23 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील सहभागी शेवटचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे वय 102 यांचे आज रविवारी खाजगी रुग्णालयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे कोकणातील राजापूर तालुक्यातील जुना कोळवण गावचे कुष्टे हे स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी सांगलीत आले. सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ आण्णा नायकवडी, जी. डी. लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा किसन अहिर, नामदेवराव कराडकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी संपर्क आला. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी त्या काळात मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल बारा वर्षे ते भूमिगत राहिले. सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यांमधील ब्रिटिश विरोधी आंदोलनात ते अग्रभागी राहिले. मुंबईत चौपाटीवर नाही तर इथे होणार गणपती बाप्पाचं विसर्जन, पाहा तयारीचे PHOTOS सांगलीच्या 24 जुलै 1943 रोजी झालेल्या जेल फोडो घटनेतील ते स्वातंत्र्य सैनिक होते. यावेळी एकूण 12 स्वातंत्र्यसैनिक या जेल फोडो आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये आण्णासाहेब पत्रावळे आणि बबनराव जाधव हे दोघे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले. बाकी अन्य 10 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. यामध्ये जयराम कुष्टे यांचा समावेश होता. हा तर कहरच! चोरट्यांनी कोरोना रुग्णाचंही लुटलं घर, चोरलेला ऐवज पाहून बसेल धक्का ब्रिटिशांविरोधात आंदोलनात त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. याच कारणास्तव ते अनेक वर्ष भूमिगत राहिले स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सांगलीतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नुकतेच त्यांना मिरज इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे आज रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पार्थिवावर मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी राष्ट्र सेवा दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, परतवंडे, असा परिवार आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या