पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, पाहा भीषणता दाखवणारे 'PHOTOS'

मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 10:22 AM IST

पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, पाहा भीषणता दाखवणारे 'PHOTOS'

मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

NDRFची तीन पथकं यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत

पुणे शहराला रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं आहे.

Loading...

कात्रज, बिबवेवाडी , सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरलं आहे. .3 ते 4 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिबवेवाडी लेक टाऊन परिसरीतील २५ वाहने वाहून गेली आहेत. एक इनोव्हा आणि एक दुचाकी वाहून गेली. कात्रज तलाव ओव्हरफ्लो झाल्याने अनेक इमारतींच्या सुरक्षाभिंती कोसळल्या.

नेक भागात विजपुरवठा बंद करण्यात आला आहे. कात्रज नवीन बोगद्यात पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या कात्रजमध्ये दाखल झाल्यात. दांडेकर पूल इथल्या ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ मदतीचं आवाहन केलं आहे.

मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नदीतून 90 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कऱ्हा नदीच्या पातळीत पहिल्यांदाच एवढी वाढ झाल्याने बारामतीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.

गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

औरंगाबाद जायकवाडी धरणाचे आणखी 6 दरवाजे उघडण्यात आलेत. म्हणजे एकूण 16 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं जायकवाडीत पाण्याची आवक वाढली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी काठावरील गावांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात तुफान पावसाने रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस गेल्या 3 तासांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली गाडी अखेर रवाना झाली आहे. तर 7 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वणी सप्तश्रृंगी गडावरही पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गडाच्या घाटात पाणीच पाणी झालं आहे. गणेश घाटात धबधबा प्रवाहीत झाला आहे. घाटातील रस्ते जलमय झालेत.

मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसानं गोदावरी नदीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...