नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, वाहनांची आणि घरांची तोडफोड

नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद, वाहनांची आणि घरांची तोडफोड

नाशिकच्या पंचवटी भागात गुंडांनी वाहनांची आणि घरांची तोडफोड केलीये. या तोडफोडीमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलीये.

  • Share this:

कपिल भास्कर, नाशिक

16 मे : नाशिकमध्ये राज्य कुणाचं असा प्रश्न पडलाय. नाशिकच्या पंचवटी भागात गुंडांनी वाहनांची आणि घरांची तोडफोड केलीये. या तोडफोडीमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागलीये.

वाहनांच्या फुटलेल्या काचांचा हा खच.. घरातल्या सामानाची नासधूसही.. ही दृश्य आहेत देवभूमी नाशिकमधील....पंचवटी भागातल्या पाथरवट लेन ररिसरात ही अशी तोडफोड करण्यात आलीये. 30 ते 35 जणांच्या टोळक्यानं पाथरवट लेनमधील घराघरात घुसून नासधूस केलीये. या शिवाय अनेक वाहनांचीही तोडफोड करण्यात आलीये. या उच्छादाने स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झालीये.

गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये सातत्याने वाहनं जाळण्यात येतात. हे वाहन जळीतकांड रोखण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पोलिसांच्या अपयशानं गुंडापुंडांचं मनोबल वाढलंय. त्यामुळे वाहनं जाळणारे गुंड आता लोकांच्या घरात घुसण्याची हिंमत करू लागलेत.

First published: May 16, 2017, 9:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading