एक दिवसाआड मिळणार भाजीपाला आणि किराणा; हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एक दिवसाआड मिळणार भाजीपाला आणि किराणा; हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 12 वाजेपासून लॉकआऊट जाहीर केला आहे. आता संपूर्ण देशभरात 21 दिवस लॉकआऊट असणार आहे.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल (प्रतिनिधी)

हिंगोली, 25 मार्च: कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 12 वाजेपासून लॉकआऊट जाहीर केला आहे. आता संपूर्ण देशभरात 21 दिवस लॉकआऊट असणार आहे.

दुसरीकडे, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा माल खरेदीसाठी लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने उद्यापासून एक दिवस आड 25 मार्च, 27 मार्च, 29 मार्च, 31 मार्च दरम्यान सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकाने व भाजीपाला विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

हेही वाचा...मुलीनेच जगासमोर आणलं संजय राऊतांचं अनोखं रुप, फेसबुकवर शेअर केला VIDEO

भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी, नमुद केलेल्या दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकणार आहेत. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी.

हेही वाचा..आता संपूर्ण नागपुरात होणार 'कोरोना' सर्व्हे, महापालिकेनं उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एकमिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणामाल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा.. मुंबई महापालिकेची नवी सुविधा, आता घरी येऊनही करून देणार कोरोनाची टेस्ट

First published: March 24, 2020, 11:44 PM IST

ताज्या बातम्या