वसंतदादांच्या जीवनावरील ऑडिओ बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

वसंतदादांच्या जीवनावरील ऑडिओ बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जीवनवरील ऑडिओ बुकचे प्रकाशन आज मुंबईत पार पडले. दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' हे पुस्तक लिहिलंय त्याच्याच डिजीटल आवृत्तीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जीवनवरील ऑडिओ बुकचे प्रकाशन आज मुंबईत पार पडले. दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' हे पुस्तक लिहिलंय त्याच्याच डिजीटल आवृत्तीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

वसंतदादांचे कार्य हे महाराष्ट्रपुरतेच नव्हे तर जगातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचावे यासाठी केलेले राजा माने यांनी लिहिलेले डिजिटल बुक महत्वपूर्ण आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा ठराव विधानमंडळात मांडताना त्यांच्या जीवनाचे पैलूचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. राजा माने यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वसंतदादांच्या जीवनातले अनेक प्रसंग नव्याने समोर येतील. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते.

वसंतदादा यांनी उच्च शिक्षणाचा विस्तार केला. त्यांनी खासगी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची मुले डॉक्टर, अभियंते झाली. कालांतराने उच्च शिक्षणाच्य क्षेत्रात चुकीच्या प्रवृत्ती आल्या मात्र सरकारने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राजेंद्र दर्डा म्हणाले की, क्रांतीकार्य करणारे वसंतदादा, सर्वसामान्यांचे वसंतदादा, मुख्यमंत्री म्हणून कुशल प्रशासक म्हणून काम केलेले वसंतदादा असे अनेक पैलू समोर आणणारे पुस्तक राजा माने यांनी ओघवत्या भाषेत लिहिले आहे. दादांचे शिक्षण कमी होते मात्र त्यांचे सामान्य ज्ञान प्रचंड होते. जनतेची नाडी त्यांना पूर्ण माहीत होती. स्वाभिमानी, विचारांचे पक्के होते, असेही दर्डा म्हणाले.

राजा माने याप्रसंगी म्हणाले, लोकनेते म्हणून वसंतदादांची जनतेला ओळख आहे. मात्र तुरुंग फोडून पळालेले क्रांतिकारी दादा, 55 व्या वर्षी राजकीय जीवनात प्रवेश केलेले दादा, त्यांचे मूळ गाव, जन्मठिकाण आदी माहिती खूप कमी लोकांपर्यंत असल्याने हे पुस्तक लिहिले अशी या पुस्तक लेखनामागील पार्श्वभूमी त्यांनी स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading