Home /News /news /

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं प्रदिर्घ आजाराने निधन, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास, वसंत डावखरे हे ठाण्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्यांचं वय 68 वर्षे होते.

पुढे वाचा ...
04 जानेवारी, मुंबई :राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं काल रात्री निधन झालंय. वसंत डावखरे यांनी गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांची  मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलय. ठाण्यातील हरी निवास इथल्या गिरीराज हाइट्समध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  तर दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. वसंत डावखरे यांचा अल्पपरिचय - शेतकरी कुटुंबात जन्म - महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाशी संबंध - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून सांभाळलं कार्य - सलग 18 वर्षे भूषवलं विधान परिषदेचं उपसभापतीपद - 1986-1987 साली ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेता - 1987 साली ठाण्याचे महापौर - 1992 पासून सलग चार वेळा विधान परिषदेवर आमदार - 1998 मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड - हिवरे गावचे सरपंच ते विधानपरिषदेचे उपसभापती हा प्रेरणादायी प्रवास  
First published:

Tags: Death, NCP, Vasant dawkhare, ठाणे, राष्ट्रवादी, वसंत डावखरे

पुढील बातम्या