मंदिरं तोडली म्हणून वाराणसीतला पुल कोसळला -राज बब्बर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2018 10:11 PM IST

मंदिरं तोडली म्हणून वाराणसीतला पुल कोसळला -राज बब्बर

16 मे : वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी हा पूल कोसळला तिथे या आधी तीन गणपतींची मंदिरं तोडण्यात आली होती. मंदिरं तोडल्यामुळे पूल कोसळला असा दावा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी केला.

वाराणसीत पूल कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला. राज बब्बर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आणि जखमींची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज बब्बर म्हणाले की, "या पूलाचं बांधकाम सुरू करण्याआधी तीन गणपतीची मंदिरं तोडण्यात आली होती. यासाठी लोकांचं म्हणणं आहे की मंदिर तोडल्यामुळे देवाचा शाप झाला"

तसंच राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी इथं यायला हवं होतं. पण ते कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहे असा टोला बब्बर यांनी लगावला. तसंच राज बब्बर यांनी मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत मिळावी अशी मागणी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...