वनगा कुटूंबियांनी बांधलं 'शिवबंधन', भाजपमध्ये उपेक्षा झाल्याची व्यक्त केली खंत

भाजपने उपेक्षा केली अशी खंत व्यक्त करत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटूंबियांनी आज मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश केला.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 09:48 PM IST

वनगा कुटूंबियांनी बांधलं 'शिवबंधन', भाजपमध्ये उपेक्षा झाल्याची व्यक्त केली खंत

मुंबई,ता.03 मे: भाजपने उपेक्षा केली अशी खंत व्यक्त करत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटूंबियांनी आज मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूत्वाचा विचार पुढे न्यायचा असल्यानेच वणगा कुटूंबियांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

केवळ राजकारणासाठी वणगा कुटूंबिय शिवसेनेत आलेलं नाही त्यांना तिकीट पाहिजे असतं तर त्यांनी इतर पक्षांचीही दारं ठोठावली असती. हिंदूंची मतं फुटू नयेत म्हणूनच त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पालघर पोटनिवडणुक लढवावी यासाठी शिवसैनिक माझ्याकडे आले होते, त्यांना योग्य वेळी निर्णय कळवेन असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

भाजपची प्रतिक्रीया

वणगा कुटूंबियांकडे भाजपनं दुर्लक्ष केलं नाही. काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूकीत कुणाला तिकीट द्यायचं याची विचारणा भाजपनं वणगा कुटूंबियांकडे केली होती. मात्र त्यांच उत्तर आलं नव्हतं. काही लोकांनी कट कारस्थान करून त्याचं मन वळवलं असावं अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. भाजप कुटूंबियांना पूर्ण मदत करेल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...