• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • अबू आझमी, वंदे मातरम गाणार नसतील त्यांनी देश सोडावा - दिवाकर रावते

अबू आझमी, वंदे मातरम गाणार नसतील त्यांनी देश सोडावा - दिवाकर रावते

'मला भले देश सोडावा लागला तरी वंदे मातरम म्हणणार नाही, ' असं अबू आझमींनी म्हटलंय. तर वंदे मातरम् म्हणायचं नसेल तर अबू आझमी यांनी खुशाल देशातून चालते व्हावं. असा पलटवार शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेंनी केलाय.

  • Share this:
मुंबई, 28 जुलै: वंदे मारतम संबंधी मद्रास हायकोर्टाच्या आदेशानं इकडे महाराष्ट्रातही राजकारण तापलंय. विधासभेत सपा आणि एमआयएमच्या आमदारांनी वंदे मातरम म्हणण्याच्या सक्तीला कडाडून विरोध केलाय. 'मला भले देश सोडावा लागला तरी वंदे मातरम म्हणणार नाही, ' असं अबू आझमींनी म्हटलंय. तर डोक्याला बंदूक लावली तरी वंदे मातरम म्हणणार नाही, असं एमआयएमचे वारीस पठाणांनी म्हटलंय. आमदार इम्तियाज जलिल यांनीही वंदे मातरमच्या सक्तीला विरोध दर्शवलाय. मुस्लीम आमदारांच्या कठोर भूमिकेवर सडकून टीका केलीय. अबू आझमी यांना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर त्यांनी खुशाल देशातून चालते व्हावं. असा पलटवार शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावतेंनी केलाय. वंदे मातरम म्हणण्यास विरोध का ? ''इस्लाम धर्मात फक्त अल्लालाच सर्वश्रेष्ठ मानलं जातं. सच्चा मुसलमान म्हणून आम्ही फक्त त्याचीच इबादत करतो. त्याशिवाय आम्ही कुणालाही वंदन करत नाही, आम्ही ज्या भारत देशात राहतो तो धर्मनिरपेक्ष आहे. इथे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार राज्य घटनेनं दिलाय. पण कुणीही आमच्यावर धार्मिक सक्ती करू शकत नाही, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातही कुठेच वंदे मातरमची सक्ती केल्याचा साधा उल्लेखही नाही, भारतीय म्हणून आम्ही नेहमी जयहिंद म्हणतोच की पण आरएसएसला अपेक्षित असलेलं वंदे वातरम आम्ही कदापिही म्हणणार नाही. अगदी त्यासाठी देश सोडावा लागला तरी बेहत्तर'' अबू आझमी, आमदार, सपा मद्रास हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय ? वंदे मातरम हे राष्ट्रगीत असल्याने ते सर्व शाळा, कॉलेजसमधून गाण्याची सक्ती केली जावी, देशातील शैक्षणिक संस्थांमधून आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम गायलं जावं. पण कुणावर त्याची तुम्ही जबरजस्ती करू शकत नाही, अर्थात संबंधीताला वंदे मातरम का म्हणू शकत नाही याचं पटेल असं कारणही द्यावं लागणार आहे. इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही वंदे मातरम भाषांतरीत करून ते गायलं जावं असंही मद्रास हायकोर्टाने म्हटलंय.
First published: