Home /News /news /

फोडल्या काचा, तुफान दगडफेक...पाहा टोल नाक्यावरील तोडफोडीचा थरारक VIDEO

फोडल्या काचा, तुफान दगडफेक...पाहा टोल नाक्यावरील तोडफोडीचा थरारक VIDEO

जवळपासच्या ग्रामस्थांकडून टोल टॅक्स वसूल करण्याच्या विरोधात हा प्रकार केल्याची शंका आहे.

    भोपाळ, 20 सप्टेंबर : देशात कोरोनाच्या संकटात अज्ञात गुंडांची दहशत वाढताना दिसत आहे. अज्ञातांना टोल नाक्याची रात्री तोडफोड केली. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळफास 39 अज्ञातांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत अज्ञात हल्लेखोर तिथून पसार झाले होते. पोलिसांच्या गाडीचे सायरन ऐकून तिथून अज्ञात गुंड पळून गेले. टोल नाक्यावर करण्यात आलेल्या तोडफोडीची दृश्य घटनास्थळावरील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जवळपासच्या ग्रामस्थांकडून टोल टॅक्स वसूल करण्याच्या विरोधात हा प्रकार केल्याची शंका आहे. यापूर्वीही टोल बूथच्या आसपासच्या गावातील लोकांनी कर वसुलीला विरोध दर्शविला होता. जेव्हापासून हा टोल बूथ बांधला गेला तेव्हापासून तो वादात आहे. इथले नागरिक त्या विरोधात आंदोलन करत आहे. हे वाचा-आरक्षणासंदर्भात योगी सरकारनं दिली Good News, आता एवढ्या जागा असणार रिझर्व शुक्रवारी रात्री काही अज्ञातांनी या टोलची तोडफोड केली आणि पोलिसांची गाडी येत असल्याचं लक्षात येताच तिथून पळ काढला. शेतकऱ्यांनी 250 रुपयांचा महिन्याभराचा टोल पास काढण्याची मागणी लावून धरली होती मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. इतकच नाही तर हा टोल तयार कऱण्यासाठी काही शेतकऱ्यांची जमीनही गेली त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मध्य प्रदेशातील इंदूर इथे घडलेल्या या घटनेचा भोपाळ पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांकडू स्थानिक लोकांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या