मुंबई, 12 फेब्रुवारी : सध्या ‘व्हॅलेंटाईन्स वीक’ सुरू आहे. प्रेमाचा आठवडा म्हणून ओळखला जाणाऱ्या या वीकमधील सर्वांत महत्त्वाचा दिवस असतो तो 14 फेब्रुवारीचा अर्थात ‘व्हॅलेंटाईन्स डे’. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खूपच खास असतो. त्यांच्याकडून स्वतःच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला सरप्राईज देणं, फिरायला घेऊन जाणं, असे विविध प्लॅन आखाले जातात. पण दुसरीकडे जे सिंगल आहेत, म्हणजेच ज्यांना बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नाही, असे अनेकजण सोशल मीडियावर ‘व्हॅलेंटाईन्स डे’चे फोटो, व्हिडिओ पाहून स्वतःला मनातल्यामनात नावं ठेवतं असतात. पण यंदा चिंता करण्याची गरज नाही.
या वेळी सिंगल लोकांचासुद्धा व्हॅलेंटाइन्स डे खास होणार आहे. होय, तुम्ही अविवाहित असला किंवा तुम्हाला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड नसेल, तरीही तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे साजरा करू शकाल. अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया या सरकारी संस्थेनं 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. कृतज्ञता म्हणून या दिवशी गायीला मिठी मारावी, असं आवाहनं करण्यातं आलय. अॅनिमल बोर्डानं हा निर्णय मागं घेतला पण गाझियाबादमध्ये तर एका तरुणीनं त्या दृष्टीनं नियोजनही केलंय.
Valentine day 2023 : व्हॅलेंटाईनसोबत घ्या 'हीर रांझा' डिशचा आस्वाद! पाहा Video
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
14 फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर या संबंधी विविध मीम्स व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रियकरान प्रेयसीचा हात पकडण्याऐवजी, गायीच्या गळ्यात हार घातला आहे. तर एका व्हिडीओमध्ये प्रियकर गायीसमोर गुलाब घेऊन गाईला प्रपोज करताना दिसतोय. अॅनिमल वेल्फेअर बोर्डानं एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘गाय मातेप्रमाणे पोषण करते, त्यामुळे तिला कामधेनू आणि गोमाता असंही म्हणतात. गाईचं प्रेम अद्भुत असून, ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.’
गाझियाबादच्या शालिमार गार्डन परिसरात जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात जाऊन 26 वर्षीय स्पर्धा चावला दररोज गायींना चारा देते, त्यांच्यासोबत वेळ घालवते. स्पर्धा हिनं गोठ्यातील काही गायींची नावंही ठेवलीत. एका गाईचं नाव तिनं ‘मीरा’ असं ठेवलं असून, ती गाय स्पर्धाला खूप आवडते.
अकेले है तो या गम है! सिंगल असलेल्यांना तरुणीची Valentine Day साठी भन्नाट ऑफर
स्पर्धानं न्यूज 18 लोकलला सांगितलं की, ‘गायीला मिठी मारणं आणि प्रेम करणं हे फक्त एका दिवसासाठी नसावं. त्यापेक्षा त्यांना रोजच त्याप्रमाणं वागवलं पाहिजं. मला वाटतं की, आपण प्राण्यांना अधिक प्रेम दिलं पाहिजे. कारण माणूस कधीकधी स्वार्थी बनतो, परंतु प्राणी असं कधीच करत नाहीत. तुम्ही एखाद्या प्राण्याला प्रेम दिल्यास ते तुम्हाला त्याच्या दुप्पट प्रेम देतात. मी हा व्हॅलेंटाईन्स डे ‘मीरा’ आणि इतर गायींसोबतच साजरा करणार आहे. हा एक चांगला उपक्रम आहे.’ असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh, Valentine Day