हेच संस्कार दिले, पडळकरांना फटकारत भाजप नेत्याचा पक्षाला घरचा अहेर

हेच संस्कार दिले, पडळकरांना फटकारत भाजप नेत्याचा पक्षाला घरचा अहेर

जर एखादी चूक केली असेल तर तिला चूक म्हणणे हे दाखवून दिले पाहिजे

  • Share this:

अहमदनगर, 01 जुलै : '50 वर्ष अविरतपणे शरद पवारांनी जनतेची कामं सातत्याने केली आहे, आपण घरांमध्ये देखील ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. त्यामुळे त्यांनी चुकीचा शब्द वापरल्यामुळे त्यांनाही चुकीला चूक सांगणे गरजेचे आहे, चुकीला चूक म्हणणं हे संस्कार आपल्याला दिल्या गेल्यामुळे पडळकरांचं वक्तव्य हे चुकीचंच आहे' असं म्हणत भाजपचे नेते वैभव पिचड यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला.

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात राज्यभर उमटल्याचे पहायला मिळाले. मात्र, पडळकरांचे हे वक्तव्य त्याचे व्यक्तिगत मत असल्याचं सांगत भाजपने देखील या प्रकरणातून आपले हात झटकले.

परंतु, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या भाजप नेते वैभव पिचड यांनी पडळकरांनां घरचा अहेर दिला आहे.

‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी जनतेसाठी कामं सातत्याने केली आहे. आपण घरांमध्ये देखील ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. जर एखादी चूक केली असेल तर तिला चूक म्हणणे हे दाखवून दिले पाहिजे हे आपल्याला दिलेले संस्कार आहे. त्यामुळे पडळकरांनी केले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे’ अशी टीका वैभव यांनी केली.

वैभव पिचड यांचे पिता व माजी मंत्री मधुकर पिचड हे भाजपामध्ये ज्येष्ठ नेते जरी असले तरी त्यांनी देखील पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी मंगळवारी एक पत्रही प्रसिद्ध केले होते.

गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैवी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं.

'आपण भाजप पक्षात जी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे, त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केले आहे. त्यांचे हे योगदान नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे', अशा शब्दात पिचड यांनी पडळकरांना फटकारून काढले होते.

संपादन - सचिन साळवे

First published: July 1, 2020, 10:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading