Home /News /news /

वढू बुद्रुक गावातला समाधीचा वाद मिटला, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

वढू बुद्रुक गावातला समाधीचा वाद मिटला, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

कोरेगाव भीमा जवळच्या ज्या वढू बुद्रुक गावातल्या गोविंद महार समाधीवरून उभ्या महाराष्ट्रात जातीय दंगलीचे तीव्र पडसाद उमटले त्याच गावातल्या ग्रामस्थांनी आज दोन्ही बाजुच्या समाजाची एकत्रित बैठक बोलावून या वादावर सामंजस्याने तोडगा काढलाय. एवढंच नाहीतर दोन्ही बाजूच्या गटांनी परस्परांविरोधातल्या तक्रारी मागे घेण्यासोबतच गावातल्या मुंलाविरोधातले अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील मागे घेण्याची तयारी गोविंद महार यांच्या वंशजांनी दर्शवलीय.

पुढे वाचा ...
04 जानेवारी, पुणे : कोरेगाव भीमा जवळच्या ज्या वढू बुद्रुक गावातल्या गोविंद महार समाधीवरून उभ्या महाराष्ट्रात जातीय दंगलीचे तीव्र पडसाद उमटले त्याच गावातल्या ग्रामस्थांनी आज दोन्ही बाजुच्या समाजाची एकत्रित बैठक बोलावून या वादावर सामंजस्याने तोडगा काढलाय. ग्रामस्थांच्या या बैठकीत गोविंद महार समाधीही नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संभाजी महाराजांची जंयती आणि पुण्यतिथी सर्व ग्रामस्थ यापुढे एकत्रितपणे साजरी करणार आहेत. तसंच यापुढे गावाबाहेरच्या संघटनांनी आमच्या इथे येऊन गावातलं वातावरण कलुषित करू नये, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केलीय. एवढंच नाहीतर दोन्ही बाजूच्या गटांनी परस्परांविरोधातल्या तक्रारी मागे घेण्यासोबतच गावातल्या मुंलाविरोधातले अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील मागे घेण्याची तयारी गोविंद महार यांच्या वंशजांनी दर्शवलीय. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाच्या 200व्या शौर्य दिनाच्या काही दिवस आधी या वढू बुद्रुक गावात गोविंद महार यांच्या समाधीवरील पत्र्याचे शेड पाडल्यावरून आणि तिथला संभाजी महाराज समाधी विषयीचा ऐतिहास माहितीचा फलक फाडल्यावरून वाद दोन गटात वाद उत्पन्न झाला होता. त्यातून या आणि आजुबाजुच्या गावांमधील 50 मुलांविरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाली आणि त्यातूनच सणसवाडीतली दंगल पेटली होती. पण या दंगलीशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा वढू बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी आजच्या बैठकीनंतर केलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज वढू गावात पुन्हा दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्र येत घेतलेल्या बैठकीत येथील गोविंद गायकवाड समाधीचे इतिहास कालीन संदर्भ मिळाल्यानंतर त्यानुसार गोविंद गायकवाड समाधीजवळ फलक लावून समाधीस्थळही पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तसेच दोन्ही बाजुंकडून गैरसमजातून दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्याबाबत सर्वमान्यतेने निर्णय घेण्यात आला.
First published:

पुढील बातम्या