वेळच्या वेळी लसीकरण: मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक, असे करताना संपूर्ण सुरक्षितता का व कशी राखावी हे जाणून घेण्यासाठी वाचा

वेळच्या वेळी लसीकरण: मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक,  असे करताना संपूर्ण सुरक्षितता का व कशी राखावी हे जाणून घेण्यासाठी वाचा

दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी वेळच्या वेळी लसीकरण( बालरोगतज्ञांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे) हाच मार्ग अवलंबला पाहिजे. जीवघेण्या दुखण्यांमध्ये रुपांतरीत होऊ शकणाऱ्या काही रोगांना तोंड देण्यासाठी तुमच्या मुलांची प्रतिकार क्षमता वाढणे गरजेचे असते.

  • Share this:

‘उपचारांपेक्षा प्रतिबंध श्रेयस्कर ’.

ही एक जुनी म्हण आहे पण ती खूप साऱ्या बाबतीत लागू होते. विशेषतः जेव्हा विषय तुमच्या मुलाची सुरक्षितता आणि चांगल्या आरोग्याचा असेल तेव्हा हा मंत्र तुम्ही अवलंबला पाहिजे. जेव्हा लसीकरणाचा मुद्दा येतो, तेव्हा नवीन पालकांना किंवा पालकत्वाकडे वाटचाल करणाऱ्या जोडप्यांना नेहमीच खूप साऱ्या शंका असतात; आणि हे अगदी स्वाभाविक आहे. तर कधी तुम्हाला कोणतीही शंका असल्यास आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कोणतंही पुढचं पाउल उचलण्यापूर्वी तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. दुसरी पायरी म्हणजे एखाद्या विश्वसनीय स्त्रोताद्वारे स्वतः काही गोष्टी शिकून घ्या जसं की, लसीकरण म्हणजे काय, त्याचं कार्य काय, आणि लसीकरणाचे महत्त्व.

वेळच्या वेळी लसीकरण करणे का महत्त्वाचं आहे?

दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी वेळच्या वेळी लसीकरण( बालरोगतज्ञांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे) हाच मार्ग अवलंबला पाहिजे. जीवघेण्या दुखण्यांमध्ये रुपांतरीत होऊ शकणाऱ्या काही रोगांना तोंड देण्यासाठी तुमच्या मुलांची प्रतिकार क्षमता वाढणे गरजेचे असते. त्यांची शरीर व्यवस्था पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे त्यांच्यासाठी असे धोके वाढू शकतात. आणि हे रोग त्यांनाच होतात असं नाही, तर एकदा त्यांना झाला की दुसऱ्या कोणाला तरी त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. लसीकरण तुमच्या मुलाचे संरक्षण तर करतेच, शिवाय हा संसर्गाचा धोकाही कमी करते.

गोवर किंवा डांग्या खोकल्यासारखे आजार त्यांना होण्याचा धोका कमी असला तरीही काहीही वाईट घडू नये यासाठी काळजी घेणे श्रेयस्कर ठरते. हे म्हणजे गाडी चालवताना सीटबेल्ट लावण्यासारखेच आहे. लसी आणि महत्त्वाचे म्हणजे वेळच्या वेळी केलेले लसीकरण अगदी तसेच काम करते.

आम्ही सुचवतो की, तुमचे लसीकरण कार्ड पहा आणि कोणत्याही प्रकारची, काही शंका असेल तर तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

तुमच्या मुलाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकावर कोविड-१९ चा परिणाम होतो आहे का?

या कठीण प्रसंगी एक पालक किंवा भावी पालक म्हणून तुमच्या मुलाची काळजी करत असाल. सध्याच्या काळात, त्यांना असणारे सर्व प्रकारचे धोके विचारात घेऊन, तुमच्या बाळाच्या लसीकरणाचे वेळापत्रक कसं सांभाळायचं याविषयी तुमच्या मनात खूप साऱ्या शंका असतील.

काळजी करू नका. जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरण ही अत्यावश्यक सेवा असल्याचे घोषित केले आहे व ते त्याचप्रकारे हाताळणे गरजेचे आहे. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या सुरक्षेसाठी तुम्हाला तुम्ही एरवी घरातील अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर जाता तेव्हा जशी काळजी घेता तशीच काळजी घ्यायची आहे. अल्कोहोलयुक्त सॅनीटायझर्सचा वापर करणे, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे, सतत दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखणे, घराबाहेर असताना कोणत्याही पृष्ठभागाशी कसल्याही प्रकारचा संपर्क टाळणे, डिजिटली व्यवहार करणे या गोष्टी पाळा. या सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवा आणि आपल्या बाळाला सुरक्षित आणि निरोगी ठेवा.

पालकत्व ही एक अवघड जबाबदारी आहे, आणि एक पालक म्हणून आपल्या बाळाच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य द्यावे लागते. तुम्ही किती काळजीत असाल याची आम्हांला कल्पना आहे. वेळच्या वेळी लसीकरण दीर्घ काळापर्यंत तुम्हांला या चिंतांपासून मुक्ती देऊ शकते. तुमच्या बालरोगतज्ञांच्या संपर्कात रहा आणि स्वतःला आणि आपल्या बाळाला सुरक्षित ठेवा.

Disclaimer: Information appearing in this material is for general awareness only. Nothing contained in this material constitutes medical advice. Please consult your physician for medical queries, if any, or any question or concern you may have regarding your condition. Issued in public interest by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited. Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India. NP-IN-GVX-OGM-200067, DOP July 2020.

संदर्भ:

https://www.cdc.gov/vaccines/parents/why-vaccinate/vaccine-decision.html

https://www.cdc.gov/vaccines/parents/visit/vaccination-during-COVID-19.html

https://www.who.int/immunization/news_guidance_immunization_services_during_COVID-19/en/

Published by: Manoj Khandekar
First published: July 29, 2020, 1:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या