तरुणाला झालं वहिणीवर प्रेम, लग्नानंतर असं झालं की डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!

तरुणाला झालं वहिणीवर प्रेम, लग्नानंतर असं झालं की डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!

प्रेमी तरुणाने त्याच्या वहिणीसोबत लग्न केले आणि जेव्हा ती सोबत जाण्यास तयार झाली नाही तेव्हा या प्रेम वेड्या तरुणाने वहिणीला कुऱ्हाडीने मारून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 15 जानेवारी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमी तरुणाने त्याच्या वहिणीसोबत लग्न केले आणि जेव्हा ती सोबत जाण्यास तयार झाली नाही तेव्हा या प्रेम वेड्या तरुणाने वहिणीला कुऱ्हाडीने मारून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

ही घटना बाराबंकीच्या मदारपूर गावातली आहे, जिथे कुऱ्हाडीच्या हत्येनंतर दहशत पसरली होती. हत्येनंतर घटनास्थळावर फक्त रक्त दिसत होते. सूनेच्या अशा प्रकारे झालेल्या हत्येनंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण मोहन हा तिच्या वहिणीवर प्रेम करीत होता आणि पतीच्या मृत्यूनंतर तिच्याशी त्याने लग्नही केले होते.

वृत्तानुसार, आरोपी आपल्या वहिणीवरही बळजबरी करत असे, याचा निषेध केल्यावर मोहनला एक दिवस इतका राग आला की त्याने आपल्या वहिणीला कुऱ्हाडीने कापून तिचा खून केला आणि तो घटनास्थळापासून फरार झाला.

या प्रकरणी बाराबंकीचे पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, आरोपी देवर मोहन हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले आणि त्यानंतर आरोपीने महिलेची हत्या केली. पुण्यातही पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतर बातम्या - जळगाव जेलमध्ये कैद्यांचा राडा, एक गंभीर जखमी

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, 7 वर्षांची मुलगी झाली पोरकी

दररोजच्या जगण्यातला संघर्ष, नोकरीतला ताण तणाव, पैशांची चणचण आणि घरं चालविण्याचा दबाव आल्याने पतीने पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केलीय. या दाम्पत्याला एक सात वर्षांची मुलगी असून ती आता पोरकी झालीय. या घटनेनं भोसरीत खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. ताण तणावाच्या सध्याच्या जगात हा ताण सहन करण्याची ताकद माणसांमध्ये कमी होतेय. त्यामुळे अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलण्यास लोक प्रवृत्त होत असल्याचं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

इतर बातम्या - दाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत

पुण्यातल्या भोसरीमध्ये निलेश आणि प्रियंका देशमुख हे दाम्पत्य राहात होतं. त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. निलेश हे नोकरी करत आपलं घर चालवत होते. पण घर चालविताना त्यांची मोठी आर्थिक ओढाताण होत असे. मुलींचा शिक्षणाचा खर्च आणि घर चालवताना होणारी कुचंबना यामुळे निलेश हे कायम तणावात असायचे. यातून त्यांना निराशाही आली होती.

या परिस्थितीमुळे त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये वादही होत होता. या नैराश्यातून त्यांनी पत्नीचा गळादाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केली. घरातले आई-वडिल दोघेही गेल्याने मुलगी प्रचंड हादरून गेली असून तिला धक्का बसलाय.

इतर बातम्या - विक्रम गोखले म्हणाले, राष्ट्रवादीत एकाच नेत्याकडे 'व्हिजन', आणि तो म्हणजे...

Published by: Renuka Dhaybar
First published: January 15, 2020, 9:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading