
दीड वर्षानंतर चार जणांच्या हत्येचा (Murder) खळबळजनक खुलासा उघडकीस आला आहे. डिसेंबर 2019 मध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांना ठार मारण्यात आलं आणि मृतदेहही (Dead Body) घराच्या आत पुरण्यात आला. मात्र, पोलीस (Police) पथकाने घराचं उत्खनन केलं असता ही घटना 28 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील 4 सदस्यांना ठार मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून घराचा जावईच आहे.

पोलिसांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, संपत्तीच्या लालचेपोटी जावई आणि दोन वर्षाच्या सूनने चौघांची हत्या केली. तर त्यांचा मृतदेह हा घरातच पुराला असल्याचं कोणालाही माहिती नव्हतं. तर सध्या पोलीस आरोपी जावई, त्याचा भाडेकरू आणि मुलगी यांची चौकशी करत आहेत.

हीरा लाल आपली पत्नी आणि दोन मुलींसोबत रुद्रपूरच्या ट्रान्झिट कॅम्प भागातील राजा कॉलनीमध्ये राहत होता. त्याची मोठी मुलगी आणि पती नरेंद्र गंगवार त्यांच्या मुलांसमवेत जवळच राहत होती. सासरच्या संपत्तीबद्दल नरेंद्रच्या मनात लालच होती. यानंतर त्याने षडयंत्र रचला आणि सगळ्यांची हत्या करत संपत्ती हडप केली. या कामात नरेंद्रच्या भाडेकरू विजयनेही त्याला पाठिंबा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 मध्ये दोघांनी मिळून सासरा हिरालाल यांचे संपूर्ण कुटुंब संपवलं. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नरेंद्र आणि विजय हेरालाल आणि त्याची एक मुलगी घरात असतांना सासरच्या घरात घुसले. सासू आणि एक मेहुणे दूध घेण्यासाठी डेअरीकडे गेले. आधी नरेंद्र आणि विजय यांनी घरात सासरा हिरालाल आणि मेव्हणीला ठार मारले आणि नंतर सासू आणि मेव्हणा दुध घेऊन परत आल्यानंतर त्यांची काठीने मारून मारून हत्या केली. यानंतर दोघे निघून गेले. दोन दिवसानंतर दोघांनीही घराच्या दुरुस्तीचं कारण देत पुन्हा घरात शिरले.

दरम्यान, या घटनेविषयी शेजाऱ्यांनी विचारलं असता नरेंद्रने सांगितलं की सासरे घर विकून गेले आहेत. त्यामुळे लोक दुरुस्तीचे काम करण्यासाठी आली आहेत. यावेळी त्यांनी घराला खड्डा केला आणि तिथे सासू आणि दोन वर्षाच्या मुलाचा मृतदेह पुरला.

यानंतर नरेंद्रने सासऱ्याची जमीन हडपण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्यावर भागधारकाला संशय आला.

अशात कुटुंबियांनाही शंका आली. कारण गेल्या दीड वर्षांपासून कुटुंब बेपत्ता आहे आणि घराला कुलूप आहे. यानंतर नरेंद्रवर संशय जात त्याच्यावर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयाच्या आधारावर जावई नरेंद्रकडे चौकशी केली तर त्याने सासू व दोन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.