मिती क्रिएशन्सचा 'गगनाला पंख नवे' पुरस्कार सोहळा ८ डिसेंबरला होणार

दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणारा 'गगनाला पंख नवे पुरस्कार २०१७' सोहळा येत्या 8 डिसेंबर रोजी होणार आहे. मिती क्रिएशन्स आणि दादरमधील अमर हिंद मंडळ या संस्थेतर्फे गेली दोन वर्षे केला हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यंदाही पाच दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या दोन संस्थांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2017 09:12 PM IST

मिती क्रिएशन्सचा 'गगनाला पंख नवे' पुरस्कार सोहळा ८ डिसेंबरला होणार

04 डिसेंबर, मुंबई : दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणारा 'गगनाला पंख नवे पुरस्कार २०१७' सोहळा येत्या 8 डिसेंबर रोजी होणार आहे. मिती क्रिएशन्स आणि दादरमधील अमर हिंद मंडळ या संस्थेतर्फे गेली दोन वर्षे केला हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यंदाही पाच दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या दोन संस्थांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा पवार तावडे, अभिनेते विक्रम गोखले, विकोचे संचालक संजीव पेंढरकर, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आणि माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निवड समितीने यंदाच्या विजेत्यांची निवड केली आहे. यावर्षी पुण्याचे राहुल देशमुख, डोंबिवलीचे विवेक नवरे, औरंगाबादचा ओंकार वैद्य, मुंबईचे राहुल रामगुडे आणि सुपर्णा शहा-जोशी या ५ दिव्यांग व्यक्ती आणि 'आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची शाळा आणि पुर्नवसन केंद्र', औरंगाबाद आणि 'दीपस्तंभ फाउंडेशन',जळगाव या दोन संस्थाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. यावर्षी या पुरस्कारांसाठी १८ संस्था आणि ३० दिव्यांग व्यक्तींनी माहिती पाठविली होती.

गेले पंचवीस वर्ष आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून सूत्रसंचालन करणाऱ्या प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्स आणि दादरमधील अमर हिंद मंडळ या संस्थेतर्फे 'गगनाला पंख नवे २०१७ ' या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मिती क्रियेशनच्या 12 वर्धापन दिनी हा सोहळा दादरच्या अमर हिंद मंडळात येत्या ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

पुरस्कार्थींची उल्लेखनीय कामगिरी -

राहुल देशमुख हे जन्मत: अंध आहेत, पण ते 'स्नेहांकित' आणि 'एनएडब्ल्यूपीसी' या संस्थांच्या माध्यमातून अंध, अपंग आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत करतात. अपघात झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात नेणं-आणणं सहज व्हावं यासाठी विवेक नवरे यांनी स्वत: रिक्षा घेतली. त्यांचा डावा पाय कृत्रिम आहे पण आर्थिक सहकार्यासोबतच मानसिक पाठबळ रुग्णांना ते देतात. ओंकार वैद्यला जन्मत: सेरेब्रल पाल्सी आहे. परंतु त्याचे विचार व लेखनशैली सर्वांना अचंबित करणारी आहे. त्याला २००६ सालचा 'राष्ट्रीय बालश्री पुरस्कार' ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला होता.

Loading...

पोलिओमुळे अपंगत्व आलं तरी त्यावर मात करत राहुल रामगुडे यांनी जलतरणाच्या अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवली आहेत. मुंबईची व्हीलचेअर क्रिकेट टीम बनवण्यात ते मग्न आहेत. ऑर्थ्रोग्रायफोसिस जन्मत:च असल्याने आणि प्रत्येक अवयव हाडामासाला चिकटलेला असल्याने सुपर्णा जोशी यांच्यावर २५ ते २६ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. पदवीचे शिक्षण घेतल्यावर नोकरी करता करता 'हेल्थ' या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यदेखील त्या करत आहेत.

औरंगाबाद येथील 'आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची शाळा आणि पुर्नवसन केंद्र' हे मराठवाड्यातले पहिले स्वमग्न मुलांसाठीचे केंद्र. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे, स्वावलंबी बनविणे, समाजात स्वमग्न मुलांविषयी जागृती करुन त्या मुलांना विशेष शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे व वेगवेगळे उपक्रम राबविणे, अशी कामे संस्था करते. जळगाव येथील 'दीपस्तंभ फाउंडेशन' संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षण गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...