फर्निचरच्या शोरूमला लागली आग, कुत्र्याने वाचवला 35 जणांचा जीव, पण...

फर्निचरच्या शोरूमला लागली आग, कुत्र्याने वाचवला 35 जणांचा जीव, पण...

इमारतीमध्ये पाळलेल्या एका कुत्र्यांने तब्बल 35 लोकांचा जीव वाचवला आहे. आग लागल्याचं समजताच त्यांना भूंकण्यास सुरुवात केली.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 12 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये अतर्रा गावात बर रस्त्यात असलेल्या एका बहुमजली इमारतीतील फर्निचर शोरूमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. शॉक सर्किट झाल्यामुळे इमारतीत आगीने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये तब्बल 5 कोटींचं सामान जळून खाक झालं.

जागा छोटी असल्याने वेगाने इमारतीमध्ये आग पसरली. त्यात सिलेंडरचा स्फोट झाल्य़ामुळे शेजारी असलेली 4 दुकानंही यामध्ये उद्ध्वस्त झाली. यात सगळ्यात विशेष म्हणजे इमारतीमध्ये पाळलेल्या एका कुत्र्यांने तब्बल 35 लोकांचा जीव वाचवला आहे. आग लागल्याचं समजताच त्यांना भूंकण्यास सुरुवात केली. त्याच्या या सतर्कतेमुळे इमारतीतील 35 लोकांचे प्राण वाचले खरे पण यात त्याचा मात्र मृत्यू झाला.

फर्निचर शोरुमचे मालक राकेश चौरसिया यांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री अचानक शॉक सर्किट झाला. तेव्हा सगळेच लोक झोपले होते. आग लागल्यानंतर माझ्या पाळलेल्य़ा कुत्र्याने भूंकण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सगळ्या लोकांची झोप उडाली. त्यामुळे 35 लोक वेळीच घरा बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. पण रस्सीने तो स्वत: बांधलेला असल्यामुळे त्याचा यात मृत्यू झाला.

त्यांनी पुढे सांगितलं की, 'या आगीची तीव्रता वाढत असतानाच घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शेजारची इतर दुकानं आगीत भस्मसात झाली.' त्यांनी सांगितल्यानुसार, या आगीमध्ये तब्बल 5 कोटींचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या फर्निचर शोरुम मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एक्सप्रेसवर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

यवतमाळमधील हैद्राबाद - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला . तर काही जण जखमी झाले आहेत. यवतमाळच्या वडकी गावाजवळ कार आणि ऑटोची धडक झाली.

कार आणि ऑटो वेगात असल्यामुळे जोरदार टक्कर झाली आणि त्यामध्ये 5 जण जागीच ठार झाले. तर तब्बल 12 जण या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळावरून जखमींना उपचारासाठी राळेगाव आणि वडणेर इथल्या रुग्णालयात दाखल केलं तर अधिक मदतीसाठी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी होती. पण पोलिसांनी घटनास्थळावरून अपघाती वाहनं आणि मृतदेह बाजूला केले. दरम्यान, पोलिसांनी 5 मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले. तर पोलीस आता अपघाताच तपास करत आहेत.

...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

Tags:
First Published: Apr 12, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading