मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आईनेच 6 वर्षांच्या पोटच्या मुलीची गळा दाबून केली हत्या, कारण वाचून बसेल धक्का

आईनेच 6 वर्षांच्या पोटच्या मुलीची गळा दाबून केली हत्या, कारण वाचून बसेल धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषाने रात्री उशिरा मुलगी झोपलेली असताना तिची गळा दाबून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषाने रात्री उशिरा मुलगी झोपलेली असताना तिची गळा दाबून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषाने रात्री उशिरा मुलगी झोपलेली असताना तिची गळा दाबून हत्या केली.

  • Published by:  Kranti Kanetkar

प्रयागराज, 15 सप्टेंबर : आर्थिक विवंचनेतून जन्मदात्या आईनं आपल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक अडचणी असल्यानं पोटच्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आईवर केला जात आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी या महिलेला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या 6 वर्षांच्या मुलीची होणारी फरफट पाहून तिच्या लग्नाची चिंता व्हाययला लागली. कसं होणार या विचारानंतर त्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

एसपी धवल जयसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा पती मोलमजुरी करत होता. दोन वर्षांपूर्वी एका अपघातात तो गंभीररित्या जखमी झाल्यानं त्याचं काम थांबलं आणि घरावर संकट ओढवलं. अशावेळी घर सांभाळण्याची आणि पुन्हा उभं करण्याची जबाबदारी उषावर आली. तिने हाताला मिळेल ते काम करत दिवस ढकलण्यास सुरुवात केली. मात्र दोन वेळेत नीट जेवता येईल इतकेही पैसे मिळेना. काय करावं हा प्रश्न होताच.

हे वाचा-खतरनाक! पुरातून गाडी काढताना अचानक प्रवाह वाढला आणि जे घडलं तो VIDEO पाहून बसेल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषाने रात्री उशिरा मुलगी झोपलेली असताना तिची गळा दाबून हत्या केली. उषाचा नवरा त्या दिवशी नातेवाईकांकडे गेला होता. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आई उषाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं आपल्या मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची मानसिक प्रकृती ठिक नसल्यानं तिने असं कृत्य केलं असावं असं म्हणणं आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात 6 वर्षांच्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Uttar pradesh