हाथरस प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, ती पीडितेची वहिनी नव्हतीच, समोर आली धक्कादायक माहिती

हाथरस प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, ती पीडितेची वहिनी नव्हतीच, समोर आली धक्कादायक माहिती

कोण होती ती महिला? पीडितेच्या घरात घुसून काय करत होती? हाथरस प्रकरणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

  • Share this:

हाथरस, 10 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस इथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशात संतापाची लाट आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आता आणखीन नवा ट्वीस्ट समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.पीडितेच्या घरात असलेली वहिनी ही खोटी असून तिचा नक्षलग्रस्तांशी संबंध असल्याची चर्चा आहे. ही महिला वहिनी म्हणून या घरात वावरत होती आणि याचा मागमूसही कुणाला नव्हता. ही महिला मध्य प्रदेशातील जबलपूर इथली असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या महिलेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

हाथरस बलात्कार प्रकरणात नक्षल कनेक्शन आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पीडितेच्या घरात राहून ही महिला मोठा कट रचत होती. याआधी देखील शुक्रवारी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि भीम आर्मीच्या लिंक या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती लागल्यानं आता तपासाची चक्र फिरली आहेत. SITने केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे वाचा-विचित्र अपघाताचा LIVE VIDEO, झाड आणि कारचं दार यामध्ये चिरडली महिला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SITच्या चौकशीदरम्यान नक्षलवादी असलेल्या या महिलेनं तोंडावर पदर ओढून घेतला होता आणि प्रश्नांची उत्तरं देत होती. घटनेच्या 2 दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती घरातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी म्हणून घरात वावरणाऱ्या नक्षलवादी महिलेच्या कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या