क्रूरतेचा कळस, ३ वर्षांच्या मुलीच्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

क्रूरतेचा कळस, ३ वर्षांच्या मुलीच्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

आयुषीच्या चेहऱ्याला ६ हून अधिक टाके घालण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे

  • Share this:

मेरठ, ८ नोव्हेंबर २०१८- मेरठ जिल्ह्यातील सरधना येथे एका युवकाने चॉकलेट असल्याचे सांगून तीन वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून तो फोडला. सुतळी बॉम्ब तोंडात फुटल्यामुळे मुलीची जीभ तुटली असून तिचा चेहरा भाजला आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, आरोपी पहिल्यापासूनच त्यांच्या घरी येत- जात होता. पण, मुलीवर त्याची वाईट नजर असेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.

कुटुंबाने पीडितेला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. मुलीच्या वडिलांनी गावातील एका मुलावर आपल्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांकडे केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ येथील मिलक गावात राहणाऱ्या शशीकुमार यांची तीन वर्षांची मुलगी आयुषी सोमवारी संध्याकाळी घराबाहेर खेळत होती. तेव्हा गावातील एक मुलगा तिच्या जवळ गेला आणि चॉकलेट खायला देतो असं सांगून तोंडात पेटता सुतळी बॉम्ब ठेवून गेला.

बॉम्ब फुटल्याचा आवाज झाल्यावर घरातले बाहेर आले तेव्हा त्यांना रक्ताने माखलेली आयुषी दिसली. लगेच कुटुंबियांनी तिला जवळच्या नर्सिंग होममध्ये उपचारांसाठी नेले. सध्या आयुषीवर उपचार सुरू आहेत. आयुषीच्या चेहऱ्याला ६ हून अधिक टाके घालण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकारी प्रशांत कपिल म्हणाले. सध्या आरोपी फरार असल्याचेही त्यांनी सांगितले.

VIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी

First published: November 8, 2018, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading