Home /News /news /

संसार थाटण्याआधीच स्वप्नांचा चुराडा, मंडपात केवळ जेवणामुळे मोडलं लग्न

संसार थाटण्याआधीच स्वप्नांचा चुराडा, मंडपात केवळ जेवणामुळे मोडलं लग्न

रात्रीच्या जेवणाच्या पंगतीला वऱ्हाडी बसले त्याचवेळी नवरदेवानं जेवणात खोट काढली आणि त्याचा राग नववधुच्या भावाला आला आणि त्यावरून वाद सुरू झाला.

    अलीगड, 05 डिसेंबर : संसार थाटण्याआधीच स्वप्न मोडली आणि लग्नाच्या मंडपात धुमाकूळ सुरू झाला. जेवणामुळे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणावरून मुद्दा चिघळला आणि दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामरी झाली. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तडजोडीचे प्रयत्न सुरू झाले. शेवटी नवरदेवानं 70 हजार रुपये ठेवून मिरवणुकीसह लग्न मंडप सोडून निघून गेला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. एका जेवणामुऴे लग्न मोडल्याची चर्चा मात्र तुफान रंगली. उत्तर प्रदेशातील अलीगड इथे धक्कादायक घटना घडली आहे. समतापूर कोटा परिसरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे. बुधवारी या परिसरात एक लग्नसोहळा पार पडणार होता. लग्न मंडपात मिरवणूक घेऊन नवरदेव आला होता. हे वाचा-रक्ताचा मोठा काळाबाजार! 500 रुपयांना मिळणाऱ्या बॅगसाठी मोजावे लागतात 2000 रात्रीच्या जेवणाच्या पंगतीला वऱ्हाडी बसले त्याचवेळी नवरदेवानं जेवणात खोट काढली आणि त्याचा राग नववधुच्या भावाला आला आणि त्यावरून वाद सुरू झाला. नवरदेवाच्या भाऊ आणि नववधुचा भाऊ यांच्यात जबरदस्त हाणामारी झाली. या घटनेची सूचना पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही पक्षातील वातावरण तापलं होतं. या घटनेनंतर अर्ध्याहून अधिक वऱ्हाडी मंडळी न जेवताच उपाशीपोटी लग्नमंपातून निघून गेली. या प्रकरणात तडजोड करताना वधूकडच्या नातेवाईकांनी लग्न मोडू नये यासाठी प्रयत्न केले. वधूला नवऱ्याकडे पाठवण्यासाठी विनंती करू लागले मात्र जेवणावरून झालेल्या या वादानं वेगळंच वळण घेत लग्न मोडलं. नवरदेवानं 70 हजार रुपये ठेवत वऱ्हाडी घेऊन मंडपातून वधूला न घेताच निघून गेला. या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या